सहस्र.... च्या नुकत्याच झालेल्या प्रयोगांसाठी भाग्यश्री ला प्रतिभा म्हणून आम्ही तालीम देत होतो .. नवीन प्रतिभाला तिची भूमिका समजणं सोपं व्हावं म्हणून तेव्हा प्रदीप ने काही improvisations घेतली.
त्यातल्या एका improvisation ची पार्श्वभूमी त्याने अशी दिली की तुम्ही कोकणात आलात त्या दिवशी जे भांडण झालं आणि त्यातनं आई आजारी पडली, त्या रात्री आई ICU मध्ये आहे आणि तू आणि प्रतिभा बाहेर बसलायत. Doctor त्यांची शेवटची round घेऊन येतात आणि तुम्हाला सांगतात की आई चं काहीही सांगता येत नाही. २४ तासात काही सुधारणा झाली तरंच आशा आहे आणि ते जातात. इथून improvisation ला सुरुवात होते. हेच improvisation मी आधीच्या एका प्रतिभा बरोबर सुद्धा केलं होतं. पण दोन्ही improvisations पुढे इतकी वेगळी झाली ! एकंच गोष्ट समान होती. ती म्हणजे मला झालेला त्रास. मी इतकी हलले दोन्ही वेळी ! विचारांची आणि भावनांची इतकी गर्दी झाली मनात !
जेंव्हा प्रदीप ने background brief दिलं, तेंव्हा माझ्या मनात आलं होतं की 'अरे हे तर आपण आधी एकदा केलं आहे, आज परत जमेल का ?' पण मी काही बोलले नाही. फक्त नव्याने त्या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवला. पूर्णपणे surrender केलं प्रत्येक क्षणाला. आणि मजा म्हणजे पुन्हा एकदा ते सर्व मला तितक्याच उत्कटतेने जगता आलं ! मला इतकं आश्चर्य वाटलं.
खरंच ! आपलं मन म्हणजे एक अद्भुत रसायन आहे ! :)
0 comments:
Post a Comment