मी नाट्यक्षेत्रात गेली अनेक वर्ष विविध स्वरूपाचं काम करतोय .. म्हणजे .. Lights, Music, Lekhan … विविध ! दिग्दर्शन करावं असं मला अगदी अलिकडेच वाटू लागलं . आणि ते ही मी करायला घेतल्यावर पाहिले एक-दोन अनुभव ज़रा खट्टू करणारेच निघाले .. तरीही मनात जी इच्छा तग धरून राहिली होती ती पुन्हा डोकं वर काढू लागली आणि सहस्रचन्द्रदर्शन या नाटकाचा जन्म झाला !
माझ्या या प्रवासात हातात हात घालूनच सहस्र .. च्या लेखनाचा प्रवास होत गेला ...
माझ्या एक नातेवाईकांच्या साठी-शांति निमित्त मी एखादं गाणं म्हणावं असं ठरलं होतं म्हणून मी त्या हॉल वर गेलो होतो .. समारंभ, त्यातलं ते उत्सवी वातावरण आलंच ... त्या सगळ्यात एक विचित्र गोष्ट घडली ...
मी गायला उभा राहिलो आणि त्या उत्सवमूर्तींना 'food poisoning' मुळे जबर उलट्या सुरु झाल्या होत्या आणि त्यातूनच त्यांना ग्लानी येऊ लागली. पण हा समारंभ परदेशातून आलेल्या आणखी एका नातेवाईकांच्या पुढाकाराने चाललेला असल्याने नक्की कोणाच्या आनंदाकड़े पाहायचं ?
नि गायचं की थांबायचं ? असे विषय तिथे चर्चेला आले ..
म्हणजे मला गावं असं वाटेनासं झालं ..
.. पण त्यामुळेच तिथे या चर्चा सुरु झाल्या
.. नि हा विषय माझ्या डोक्यात सुरु झाला ....
पुढे एकदा तू नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी मी एका कवितेत नेहेमी करतो तसा चंद्राचं दृश्य उभं केलं आणि त्या चंद्राखाली .. चक्क ती कविता एकीकडे चालू असतानाच .. एक आजी आणि एक नाट गप्पा मारताना मला दिसल्या .. अगदी क्षणभर .. मग हळूहळू पुढे केव्हातरी त्या आजीची सर्व कथा आकाराला येत गेली .. अर्थातच माझ्या मनातच ..
मला मुलात सुचलेल्या नाटकात आजीला तिच्या सहस्रचंद्रदर्शनाआधी चार दिवस
'paraplegia' झाला आहे असं सुचलं होतं ... आणि पहिल्या अंकाच्या शेवटी अगदी मोक्याच्या वेळी ती निधन पावते असं सुचलं होतं ... मी ते लिहिलं आणि मोहितला वाचून दाखवलं .. तो काही फारसा मोहात पडलेला वाटला नाही .. मग एक वर्ष गेलं जेव्हा हे स्क्रिप्ट पदूनाच राहिलं ... नंतर मी ते चेतन दातारला वाचायला दिलं ... त्याने नुकतंच 'वाडा' केलं होतं .. माझं नाटक वाडाप्रमाणेच होतं आहे का ते मला पाहायचं होतंच .. पण चेतनची प्रतिक्रिया वेगळीच निघाली ... ती उत्साहवर्धक होती !
त्याने मला तेव्हा जी एक दिशा दिली त्यामुले आज जे नाटक सादर होताना दिसतं ते तसं साध्य झालं. त्याने दिलेल्या या दिशेवर माझ्या या (त्याच्या शब्दात चांगल्या चितारलेल्या किंवा दिसू लागलेल्या ) यातल्या प्रत्येक पात्रासोबत राहाताना हे नाटक आकार घेत गेलं ... ती खरी हाडामांसाची माणसं मिळावीत हे खरं आणि मुख्य काम होतं आणि ते पुढेपुढे योग्य प्रमाणात सफल झालं ...
साधारण आकार-प्रकार माहीत असलेल्या या माणसांच्याबाबत, ''त्यांच्या आयुष्यात कधी काय घडत गेलं असेल नि कसं? '' त्याचा शोध मी माझ्या कलाकारांसोबत घेऊ लागलो .. पस्तीस वेगवेगळे प्रसंग जे या नाटकातमुळी नाहीतच ते आम्ही करुन पाहिले .. प्रत्येकजण त्या त्या प्रसंगामाधे आप-आपल्या स्वभावातून वागायचा प्रयत्न करत राहिला .. .. मनातल्या मनात एका अंधारात आम्ही सगळे फिरत होतो .. .. चाचपडत ज्याला त्याला आपापल्या भूमिकेच्या ... म्हणजे नाटकातल्या आपापल्या वर्णनाच्या व्यक्तीचं बोट हवं होतं .. ते हाती लागलं की प्रत्येकजण त्या जगात मस्त फिरणार होतं ... आणि सापडत गेली .. माणसं प्रत्येकालाच ... खरी माणसं .. खरे विकार ... खरे प्रसंग ...
या सगळ्यातच मी लिहीतही होतो .... ते ही आकार घेत गेलं आणि एक नाटक आकाराला आलं ... दोन अंकातलं ... सहस्रचंद्रदर्शन !
Showing posts with label PDA. Show all posts
Showing posts with label PDA. Show all posts
Friday, June 12, 2009
जन्म ...
Posted by Unknown at 4:10 PM 1 comments
Labels: PDA, Pradeep Vaiddya, चेतन दातार, प्रदीप वैद्द्य, सहस्रचंद्रदर्शन
Subscribe to:
Posts (Atom)