BLOGGER TEMPLATES AND TWITTER BACKGROUNDS

Friday, June 19, 2009

आमची कोकण ट्रीप ...सहस्रचंद्रदर्शन.... या नाटकात मी श्वेता आहे. या नाटकादरम्यान आम्ही खूप वेगवेगळी process केली आहे पण मला आत्ता प्रामुख्याने या process बद्दल लिहावसं वाटतं... म्हणजे आमची कोकण ट्रीप. आमच्यातल्या फार कमी जणांना कोकण नीट माहित होतं. म्हणून आम्ही कोकणात गेलो. ..... आंजर्लेला.... आमच्यातल्या एका मुलाच्या बहिणीचं तिथे घर आहे. ती मुंबईला राहते. घर रिकामं होतं. काही लोक हे आदल्या दिवशी गेले आणि काही नंतर. आधी जे गेले होते त्यांनी उरलेल्यांचं स्वागत अगदी कोकणातल्या लोकांसारखं केलं. दीपा आणि वसुधाने घरासमोर रांगोळी काढली होती. आल्यावर सगळ्यांचे पाय धुतले. वसुधा आणि शांताने गूळपोहे केले होते. तिथे आम्ही नाटकातली पात्र म्हणूनच रहात होतो. चुलीवर पाणी तापवत होतो.


नाटकात जे घराबाहेरचे scene होते ते आम्ही तशी locations शाधून तिथे केले . प्रत्यक्ष त्या जागी जाऊन scene करणं हे फार वेगळं असतं. तिथल्या निसर्गाचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, माती, दगड, पाण्याचा आवाज, वातावरण सगळंच वेगळं होतं. त्यामुळे वेगळंच जाणवत होतं.. या सगळ्या गोष्टी scene मध्ये काही ना काहीतरी contribute करत होत्या . ते scene नेहमीपेक्षा फार वेगळे होत होते.


रात्री आम्ही कुळथाचं पिठलं केलं, चुलीवर भात केला, चुलीत कांदे भाजले. त्या सगळ्याची खूप मस्तं चव होती. जेवायच्या आधी रामरक्षा म्हटली. मग जेवताना प्रदीपदादाने त्या पुढे process चा भाग म्हणून .. प्रत्येकाला character नुसार वेगवेगळे वास, स्पर्श, आवाज, त्या वस्तूचं दिसणं हे लक्षात ठेवायला सांगितलं. उदा.: मला धबधब्याचा किंवा जोरात पडणाऱ्या पाण्याचा आवाज, केवडा, चंदन.


कोकणातलं घर पाहिल्यामुळे वाडी, माजघर, माडी, पडवी म्हणजे काय हे नीट कळलं. नाटक करताना ते सर्व डोळ्यासमोर येत गेलं. तिथली माणसं, तिथला समुद्र, समुद्राचा आवाज, झाडी, देऊळ, डोंगर, तिथली शांतता सगळंच वेगळं आणि अविस्मरणीय आहे.


या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम आमच्या performance वर होत गेला.


ही trip आम्ही कधीच विसरू शकत नाही.

0 comments: