BLOGGER TEMPLATES AND TWITTER BACKGROUNDS

Tuesday, June 23, 2009

कोकणातल्या ''दीपा''कडचा प्रवास


मी संयोगिता,म्हणजे सहस्र मधली दीपा दीक्षित. नाटकातल्या दिक्षितांच शेंडेफळ.
साधारण जुलै ऑगस्ट मध्ये मला कळलं की मी या नाटकात दीपा आहे. खरं सांगायचं तर मी तेव्हा शहरातली दीपा होते म्हणजे पुण्यातली. मग माझा कोकणातल्या दीपाकडचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास फार सुंदर होता. त्यात फक्त मी नव्हते तर माझ्याबरोबर माझं सगळं दीक्षित कुटुंब होतं. एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी, एकमेकांबरोबर घरच्यांसारख मोकळं आणि सहज वागण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप इंटरेस्टिंग प्रोसेस केली. त्यात आम्ही खूप improvisations केली.
प्रदीप दादाने (आमचा डिरेक्टर) आम्हाला काही विशिष्ट गोष्टी ज्यांचा वास, रंग, आवाज, चव, स्पर्श etc character ला उपयोगी पडतील अशा काही गोष्टी सांगितल्या eg माझ्यासाठी आंब्याचा मोरंबा, घंटेची किणकिण, मधुमालतीची फुलं etc.
सगळ्यात धमाल म्हणजे आम्ही सगळे कोकण , तिथली लोकं समजून घ्यायला गेलो .तिथे आम्हाला फार वेगवेगळे अनुभव आले जे पुढे actual shows च्या वेळी खूप महत्वाचे ठरले. ती ट्रीप माझा आयुष्यातली अविस्मरणीय ट्रीप होती.


'सहस्र.. ' मुळे मला खूप चांगले, खूप जवळचे मित्र-मैत्रिणी मिळाले....आमच्या सगळ्यान्मधेच अगदी घट्ट bonding झालं ....
सहस्र हे माझं आत्तापर्यन्तचं सगळ्यात आवडतं नाटक आहे. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ते आता पुन्हा सदर करतोय !!

0 comments: