सहस्रचन्द्रदर्शन मधे मी ताईची भूमिका करते. ह्या नाटकांत मला जरी फार आव्हानात्मक भूमिका नसली, तरी नाटकाची कथा, त्यातली पात्रं आणि त्यातले कलाकार, ह्यामुळे मला मजा येणार हे माहित होतं. ह्या नाटकाची process करताना मला स्वत:मधल्या अनेक गोष्टींचा पुन्हा प्रत्यय आला.
नाटकाच्या तालमी सुरु झाल्या तेंव्हा प्रदीप म्हणाला की आपण लगेच script वर काम सुरु न करता आधी त्या सर्वं पात्रांच्या आयुष्याबद्दलच्या आणि त्यांच्या एकेमेकांशी असलेल्या नात्यांबद्दलच्या back stories ची improvisations करणार आहोत.
पहिल्या एक-दोन improvisations च्या वेळेची ही आठवण. एक improvisation चालू असताना अचानक मला समजलं की माझा डोक्याने थोडा अधू भाचा गणा, म्हणजे गणेश, माझ्या मुलीला एकदा रात्री काहीतरी odd मिठी मारतो. मी इतकी प्रचंड संतापले ! संतापाने मला जे रडू आलं ते नंतर त्या improvisation बद्दलची चर्चा संपली तरी आवरंत नव्हतं. त्या वेळी सचिन ने गणा ची भूमिका केली होती. मला कितीतरी वेळ त्याच्याकडे बघता सुद्धा येत नव्हतं. एकीकडे हे समजत होतं की सचिन आणि गणा वेगळे आहेत, पण तरी त्या दिवशी त्यानंतर मला त्याच्याकडे रागाशिवाय इतर कुठल्या भावनेने पहाताच येत नव्हतं.
त्यानंतर अनेक दिवसांनी एका improvisation मधे एक गडी माझ्या मुलीला, श्वेताला, ती लहान असताना भुताची गोष्टं सांगून घाबरवतो. ती खूप रडते. हे सगळं wing मधे होतं आणि मी चिडून घरात येते अशी माझी entry होती. तरी मला इतका राग आला होता की शांत व्हायला जरा वेळंच लागला.
माझ्या लोकांना अगदी इतकासा सुद्धा त्रास कोणी दिला कि मी disproportionately चवताळते ह्याचा प्रत्यय मलाच नाही तर माझ्या सहकलाकारांनाही आला :)
- रुपाली भावे (सहस्रचंद्रदर्शन मधली ''ताई'')
Thursday, June 18, 2009
सहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...
Posted by Unknown at 9:34 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment