Hi!
मी चिनू (म्हणजे श्वेताचा पुण्यातला मित्र जो कि सर्पमित्र पण आहे). सहस्र मध्ये मी चिनूची भूमिका करतो. सहस्र बद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, सहस्रच्या खूप आठवणी, किस्से आहेत सांगण्यासारखे. सहस्रच्या process च्या दरम्यान मला खूप काही मिळालं, खूप मज्जा केली आम्ही सगळ्यांनी ह्या process दरम्यान. आणि एक की सहस्र हे माझं सगळ्यात आवडत नाटक आहे आणि आम्ही ते पुन्हा करणार आहोत म्हणून भारी वाटतंय. अगदी सुरवातीपासून आम्ही सहस्रसाठी खूपच process केली आणि त्याचा आम्हा सर्वांना खूप फायदा झाला.
मला आठवतय की मला आणि श्वेताला (अमृता वाणी) अगदी सुरवातीला जेव्हा आम्ही सगळेजण आपआपल्या सीनसाठी काम करत होतो तेव्हा दादानी मला आणि अमृताला process चा एक भाग म्हणून एक exercise सांगितला होता. त्याने मला आणि अमृताला माझ्या गाडीवरून फिरून यायला सांगितलं होतं. म्हणून मी आणि अमृता निघालो. त्यावेळी आम्ही गुप्ते मंगलला तालीम करत होतो. तर गुप्ते पासून थोड्या अंतरावर गेलो आणि अमृता म्हणाली की तिला मला काही तरी सांगायचं आहे, मग मी म्हणालो की मग सांग की... पण ती काहीच बोलत नव्हती .. मग जरा वेळानी परत म्हणाली कि मला तुला काहीतरी सांगायचंय आणि परत गप्प बसली. माझी चिडचिड व्हायला लागली होती. ती नुसतंच सांगायची की मला तुला काहीतरी सांगायचंय पण काहीच बोलत नव्हती. असा बराच वेळ गेला आणि नंतर माझी जरा जास्तीच चिडचिड व्हयला लागली, मी चिडून ओरडून तिला पुन्हा विचारलं पण ती काहीच बोलत नव्हती. मला एकदा वाटला पण होत की सरळ गाडी रस्त्याच्या कडेला घ्यावी आणि विचरावं .. कारण मी ओरडून तिला विचारत असताना सिग्नलला सगळे आमच्याकडे बघत होते आणि त्यामुळे मला जरा जास्तीच राग आला होता . पण आता आम्ही फिरून गुप्तेच्या जवळ आलो होतो पण ती काहीच बोलली नव्हती. शेवटी गाडी लावताना ती म्हणाली की गाडी पार्क कर मी सांगते. मी गाडी पार्क करायला गेलो पण तिथे पण माझी चीडचीड झाली, लौकर जागाच मिळत नव्हती. शेवटी एकदाची गाडी पार्क केली आणि परत आलो तर अमृता वर निघून गेली होती. आता तर जास्तीच सटकलं माझं डोकं ! मी पण तावातावानी वरती गेलो. मी दादाला सांगणार होतो तेवढ्यात त्याने आम्हाला सीन करायला सांगितला..... आणि त्या दिवशी आमचा सीन खूपच चांगला झाला. मला खूप बर वाटलं.
त्यानंतर अनेकदा process चा भाग म्हणून मी आणि अमृता खडकवासल्याला, भूगाव लेक इथे गेलो. नाटकात आमचा सीन हा नदीकाठी घडतो म्हणून नदीकाठचा फील यावा, पाण्याचा आवाज, दगड, झाडं, पक्षी, पाण्यात दगड मारल्यानंतर येणारा आवाज या सगळ्या गोष्टी त्यामुळे अनुभवायला मिळाल्या.
माझ्यासाठी म्हणून दादानी मला आणि अमृताला सर्पोद्यानातपण जायला सांगितलं होत, खूप मज्जा आली त्यावेळी.
process चाच एक भाग म्हणून आम्ही रोज चित्र पण काढत होतो, दादा कधीकधी आम्हाला writing exercise पण सांगायचा त्याचाही आम्हाला खूप फायदा झाला !
आमचं नाटक हे मुळातच कोकणातलं , आणि आमच्यात अनेक जणांनी कोकण नीट पाहिलं नव्हतं. म्हणजे तिथले लोक कसे राहतात, त्यांचं daily routine कसं असतं, तिथली लोकं कोणती कोणती कामं करतात ह्याची माहिती होण्यासाठी आम्ही एकदा कोकणात आंजर्लेला गेलो होतो. तिथे तर खूप मज्जा केली आम्ही. दादानी प्रत्येकाला त्याच्या character नुसार काही ना काहीतरी exercise दिले होते. प्रत्येकाला character नुसार specific वास, आवाज, काही कामं, फुलं etc.. सांगितलं होत. मला त्याने tourist म्हणून फिरायला सांगितलं होतं. वेगवेगळे पक्षी, फुलं, झाडं etc बघायला सांगितलं होतं. तिथे आम्ही सगळेजण नाटकातल्याप्रमाणे वागत होतो, आणि खरंच मला त्या दिवसात मी दीक्षित कुटुंबात आल्यासारखा वाटत होतं . आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्या संपूर्ण ट्रीप मध्ये मलाच फक्त साप दिसले, बाकी कोणालापण नाही.
कोकणात आम्ही सगळ्यांनी आपले सीन त्या त्या locations वर जाऊन केले, खूप मज्जा आली. मला आणि अमृताला आम्ही ज्या घरात राहिलो होतो त्या घराच्या मागच्या बाजूला एक पायवाट होती जी की डोंगरावर गणपतीच्या देवळात जात होती .. त्या ठिकाणी सीन करताना एक पाण्याचा एक ओहोळ वाहत होता त्याचा इतका छान आवाज येत होता की बास् ... खूप छान वाटत होतं ...
कोकणात जाऊन आल्यावर तिथली झाडं, फुलं ह्या सगळ्याचा आमच्या performance वर खूप छान effect झाला !
0 comments:
Post a Comment